बॉक्सऑफिसवर सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ नं चौथ्या दिवशी केली एवढी कमाई

 

मुंबई | अभिनेता सलमान खान हा त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटानं सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील गाणी, अॅक्शन सिन्स, सलमानचा हटके अंदाज या सर्वांनाच प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं सुरवातीला जास्त कमाई केली नाही. पण वीकेंडला मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी केली. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे यांची जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसत आहे. त्यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. सलमान आणि पूजा यांच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 25.75 कोटी तर तिसऱ्या दिवशी 26.61 कोटींची कमाई केली. ‘किसी का भाई किसी की जान’न चौथ्या दिवशी 10.50 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई जवळपास 78.67 कोटी एवढी झाली आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. छोटू मोटू’ ,’येंतम्मा’, ‘नय्यो लगदा’, ‘बिल्ली बिल्ली’, ‘बथुकम्मा’ आणि ‘जी रहे थे हम’ या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत.

Team Global News Marathi: