गणपतीपुळे येथील बोट क्लब’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ |

 

मुंबई | सिंहगड येथील नूतनीकृत पर्यटक निवासाचे उद्घाटन आणि गणपतीपुळे येथे बोट क्लबचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. मेक माय ट्रिप, स्काय-हायसह विविध संस्थांसोबत सामंजस्य करारही झाले

. राज्याच्या पर्यटन क्षेत्राने एकप्रकारे ‘टेक ऑफ’ घेतले. पर्यटन विभागाच्या विविध उपक्रमांमुळे रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकिंग अधिक सुलभ होणे आणि जगभरातील पर्यटकांसाठी ही बुकिंग सुविधा उपलब्ध होण्यासाठी ‘मेक माय ट्रिप’ आणि ‘गोआयबिबो’ या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरून कोठूनही बूक करता येईल.

महाराष्ट्रात स्काय डायव्हिंग हा साहसी क्रीडा प्रकार सुरू करण्याच्या दृष्टीने स्काय-हायसोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला.

Team Global News Marathi: