भाजपने बेईमानी केली नसती तर उद्धवसाहेब देखील बेईमान झाले नसते

 

मुंबई | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. राज्यात विरोधात बसलेल्या आणि केंद्रातील मोदी सरकारवर उद्धव ठाकरे बसरले होते. केवळ पित्याला दिलेलं वचन म्हणून मी मुख्यमंत्री पदावर बसलोय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाबडेपणाचा मुखवटा धारण केला, अशी टीका केली होती. त्यावरून आता शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देतं भाजपवर निशाणा साधला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने चार बंडखोर उमेदवार रिंगणात उतरवले होते. शिवसेनेविरोधात बंडखोर उमेदवार देऊन भाजपने बेईमानी केली होती. पहिलं बेईमान कोण हे भाजपने तपासावं, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. पहिले ते बेईमान झाले नसते तर, जसं ते आज म्हणतात तसं उद्धवसाहेब बेईमान झाले नसते, असं म्हणत देवेंद्र फडणीसांच्या टीकेला पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांनी भाबडा मुखवटा परिधान केला आहे. राजकारणात महत्त्वकांक्षा असणं चुकीचं नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आता त्यावर एकट्या शिवसेनेचा प्रश्न असता तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते. परंतु, हा विषय एकट्या शिवसेनेचा नव्हता. सोबत असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: