भाजपाकडून नालेसफाईची पोलखोल – ‘जागो आयुक्त प्यारे’ – प्रभाकर शिंदे

मुंबई शहरात १०७ टक्के नालेसफाई झाल्याचा मुंबईच्या महापौरांचा दावा मान्सूनच्या पहिल्याच पावसात फोल ठरला. याबाबत सत्यस्थिती निदर्शनास आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबई शहरातील अद्याप साफ न झालेल्या नाल्यांची तसेच त्यामुळे प्रशासकीय, प्रभावित पुरप्रवण क्षेत्राची यादी देत दावे प्रतिदावे बाजूला ठेवून शहरातील अपूर्ण नालेसफाई तातडीने पूर्ण करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

महापौर महोदया आयुक्त महोदय आता तरी जागे व्हा आणी नालेसफाई करा.या सर्व नाल्यांची सफाई करताना भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक या कामी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करतील असेही या पत्रात प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे. महापालिकेकडून नालेसफाई १०७ टक्के केली असल्याचा दावा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र नालेसफाई झाल्याचे दिसत नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात संपूर्णतया ‘मुंबईची तुंबई’ झाल्याने सर्वसामान्य मुंबईकरांना पाण्यातून वाट काढत घरी जावे लागले होते तर अनेकांच्या घरात शिरलेले पावसाचे पाणी आठ – दहा तासानंतरही ओसरले नव्हते.

दरवर्षी शेकडो कोट्यवधी रुपये नालेसफाईच्या नावाखाली महापालिकेकडून खर्च केले जातात मात्र, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सुटत नाहीत. नालेसफाईचे पैसे म्हणजे कंत्राटदारांनी सत्ताधाऱ्यांबरोबर संगनमताने केलेली तिजोरी सफाई आहे अशी टीका भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे.

Team Global News Marathi: