भाजपची सध्याची अवस्था म्हणजे मी नाय त्यातली कडी लाव आतली – सामना

 

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीने थेट पालिकेत अटक केली आहे. याप्रकरणावरून शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली आहे. भाजपची अवस्था म्हणजे सध्या मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली, अशा प्रकारची झाली आहे.

या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे कधीच वावडे नव्हते. हेच लोक ऊठसूट मुंबई पालिकेवर निशाणा साधत असतात. पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळतंय त्याचा मात्र त्यांना विसर पडतो, अशी टीका शिवसेनेनं अग्रलेखातून भाजपवर केली आहे.

बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचं त्यामुळे नाकच कापलं गेलं, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला आहे.

दरम्यान, जनतेच्या पैशांची घाऊक लूट करायची आणि बोट मात्र फक्त मुंबईकडे दाखवायचं. हा यांचा कावा शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आहे म्हणून, असा आरोपही शिवसेनेनं भाजपवर केला आहे.आता सेनेने अग्रलेखातून भाजपवर केलेल्या टीकेला भाजपा नेते काय उत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: