मोठी बातमी | या अभिनेत्याला ड्रग्स प्रकरणी करण्यात आली अटक

 

मुंबई | सुशांत सिह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. त्यात अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यातच आता आणखी एका अभिनेत्याला अटक करण्यात आलेली आहे. अभिनेता अरमान कोहली याला अटक करण्यात आली असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

अरमान कोहली याच्या मुंबईतील घरात ड्रग्ज जप्त केल्यानंतर एनसीबीने त्याला अटक केली होती. आजतागायत अनेक बड्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आणि अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. अरमान कोहली याला मुंबई न्यायालयाने तब्बल १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. एनसीबी पथकाने शनिवार सकाळी एका ड्रग पेडलरला अटक केली होती.

गुप्त माहितीच्या आधारावर एनसीबीने बॉलीवूड अभिनेता अरमान कोहली याच्या घरावर छापेमारी करण्यात आली. मुंबई विभागाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेड़े यांच्या मार्गदर्शनाखाली ही छापेमारी करण्यात आली.

Team Global News Marathi: