टी सिरीजचे मालक भूषण कुमारवर बलात्काराचा गुन्हा, मुंबईत अंधेरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल |

 

मुंबई |  टी सिरीज कंपनीचे मालक भुषण कुमार यांच्यावर एका ३० वर्षीय महिलेने शारीरिक छळ केल्याचा आरोप लावून एकचखळबळ उडवून दिली आहे. सदर महिलेला आगामी प्रोजेक्टमध्ये काम मिळवून देण्याचे सांगत त्यांनी फायदा उचलल्याचे तिचे म्हणणे आहे. त्यानुसार, याप्रकरणी डी. एन. नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास सुरू आहे.

टी सिरीज या प्रसिद्ध म्युझिक कंपनीचे मालक भूषणकुमार यांच्यावर एका ३० वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केला आहे. पीडिताने तीन लोकेशनचा दावा सांगत, संबंधित ठिकाणी आपल्यावर बलात्कार करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. भूषणकुमार यांनी ३ वर्षे आपले लैंगिक शोषण केले.

सन २०१७ पासून २०२० पर्यंत त्यांनी तिच्याशी गैरकृत्य केल्याचं तिने म्हटलं आहे. दरम्यान, २०१८ मध्येही मीटू कॅम्पेनवेळीही भूषणकुमार यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचा आरोप केला होता. भूषणकुमार हे टी सिरीजचे एमडी असून अनेक मोठ्या फिल्मचे निर्मातेही आहेत. अद्याप भूषण कुमार यांच्याकदेउं कोणतीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

Team Global News Marathi: