भाजपने केली मिशन बारामतीची घोषणा तर दुसरीकडे पार्थ पवार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी

 

शिंदे गटाने पुकारलेल्या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता तसेच बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपसोबत सत्तास्थापन केली आहे.राज्याच्या राजकारणात झालेल्या या राजकीय भूकंपाचे सूत्रधार भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच असल्याचं खुद्द एकनाथ शिंदे यांनीच विधानसभेत बोलताना मान्य केलं होत. शिंदे – फडणवीस यांनी घडवून आणलेला हा भूकंप ताजा असतानाच ही जोडगोळी आणखी काही धक्के देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातआहे.

अशातच आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षावर पोहोचल्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्यासोबतची वाढती जवळीक चर्चेत असतानाच आता पार्थ पवार वर्षा निवास स्थानावर पोहोचल्याने राजकीय चर्चा लागल्या आहेत.

मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी उपस्थिती लावत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित व एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांचा फोटो चर्चेचा ठरला होता. अमित ठाकरे व श्रीकांत शिंदे यांच्या फोटोची चर्चा सुरु असतानाच आता श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत पार्थ पवार यांनी वर्षाला दिलेली भेट चर्चेचा विषय ठरत आहे.

Team Global News Marathi: