संजय राऊतांचा मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज ?

 

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी अर्ज केला दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात संजय राऊतांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. राऊत यांच्या अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांना गोरेगावमधल्या पत्राचाळ प्रकरणात ईडीकडून मनी लॉण्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत सध्या आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं राऊतांना आज जामीन मिळणार का? याकडे शिवसेनेसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती. त्यानंतर पुन्हा त्यांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 5 सप्टेंबर रोजी संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला असून न्यायालयानं त्यांना 19 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Team Global News Marathi: