भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज भारतीय यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज बुडवल्याप्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून मोहित कंबोज यांच्यासह त्यांच्या कंपनीतील दोन संचालकांविरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित कंबोज यांनी बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बँकेची फसवणूक करत कर्ज बुडवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. बँकेकडून कर्ज घेतले होते पण कर्जाची ही रक्कम ज्यासाठी घेतली होती त्या कामासाठी न वापरता इतरत्र वापरल्याचा मोहित कंबोज यांच्यावर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहित कंबोज हा गुन्हा दाखल होताच स्वत: मोहित कंबोज यांनी ट्विट करत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आज माझ्या विरुद्ध ईओडब्ल्यू मुंबईत पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक बनावट एफआयआर नोंदवला आहे. माझ्या विरुद्ध एफआयआर करुन जर वाटत असेल की मी घाबरून जाईल तर तसं नाहीये. मी तथ्यांसह न्यायालयात जाईन.” असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटले आहे.
या ट्विटमध्ये एक व्हिडीओ असून त्यात त्यांनी म्हटलं, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की माझ्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी एक एफआयआर नोंदवला आहे. जुनी कंपनी जी 2017 मध्ये बंद झाली आणि त्यात काही बँक इश्यूज काढत माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. मला असं वाटतं की, महाविकास आघाडी सरकार माझा आवाज दाबेल किंवा मला कुठल्याही प्रकारे शांत करेल पण तसे होणार नाही. नवाब मलिक असो किंवा संजय राऊत असोत.
My Sources :-
Today A Fabricated FIR Is Registered Against Me In EOW Mumbai By CP Sanjay Panday !If U Think By Putting FIR Against Me
In A Matter Which is long back settled and My Voice Can Be Suppress Or U Can Frighten Me Than U Are Wrong.
I Will Go To Court With Facts .— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) May 31, 2022