मेट्रोसाठी मालाडमध्ये झोपड्या पाडण्यास सुरुवात; अतुल भातखळकर यांची ठाकरे सरकारवर घणाघाती टीका

 

मुंबई | शहरातील मालाडमधील कुरारयेथे मेट्रोच्या स्टेशनच्या कामसााठी परिसरातील झोपड्यांवर आज सकाळी पालिका आणि मुंबई पोलिसांच्या देखरेखेखाली कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मोठ्या पोलिस बंदोबस्तात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे. या कारवाईस भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

यावर ट्विट करून या कारवाईला विरोध दर्शवला आहे “आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा…
पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं.

तसेच आणखी एक ट्विट करून ते म्हणतात की, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.

या कारवाई नंतर भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत.’

 

Team Global News Marathi: