मुंडे-फडणवीस यांच्या राजकीय सबंधनावर रामदास आठवले यांचे खळबळजनक विधान |

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात मुंडे भगिनींना डावलल्यामुळे पंकजा मुंडे यांनी मुंबईत आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाव न घेता देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. तसेच मोदी, शहा आणि नड्डा आपले नेते असल्याचे विधान करून थेट फडणवीसांवर हल्लबोल केला होता. या त्यांच्या विधानामुळे भाजपात गटा-तटाचे राजकारण सुरु झाले होते.

याच पार्श्वभूमीवर आता रिपाई नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत असताना, “देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या राजकीय संबंधांवर मोठा खुलासा केला असून, पंकजा मुंडे या देवेंद्र फडणवीसांच्यावर नाराज आहेत. मात्र चर्चेतून त्यांची नाराजी लवकरच दूर होईल. त्यामुळे, पंकजा मुंडेंनी फडणवीसांना लक्ष्य करू नये असं वक्तव्य केलं आहे.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या भगिनींना भाजप सातत्याने डावलत आहे, असा आरोप भाजपवर इतर पक्षांकडून केला जात आहे. भाजपत ओबीसींना डावललं जातं, फडणवीसांनी मला त्रास दिला, असा थेट आरोप एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करताना केला होता. यातच आता रामदास आठवलेंच्या या वक्तव्याने भाजपत खरंच ओबीसी नेत्यांना डावलले जाते, की फडणवीसांच्या नेतृत्वात असल्यामुळे भाजपत हे घडत आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.

Team Global News Marathi: