मुंबई | शहरातील मालाडमधील कुरारयेथे मेट्रोच्या स्टेशनच्या कामसााठी परिसरातील झोपड्यांवर आज सकाळी पालिका आणि मुंबई पोलिसांच्या देखरेखेखाली कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई मोठ्या पोलिस बंदोबस्तात करण्यात आली आहे. यावेळी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शविला आहे. या कारवाईस भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही विरोध केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.
आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा…
पैसे केंद्राचे, मेहनत @Dev_Fadnavis यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री @OfficeofUT यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
यावर ट्विट करून या कारवाईला विरोध दर्शवला आहे “आयत्या पिठावर रेघोट्या आणि आयत्या बिळावर नागोबा…
पैसे केंद्राचे, मेहनत देवेंद्र फडणवीस यांची आणि चमकोगिरी मेट्रोला कोलदांडा घालणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यासाठी पोलीस बळाचा वापर करून तोडली गेली मराठी माणसांची घरं.
ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री @OfficeofUT
यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत. @Dev_Fadnavis @BJP4Mumbai @MPLodha— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021
तसेच आणखी एक ट्विट करून ते म्हणतात की, ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत असे ट्विट त्यांनी केले आहे.
या कारवाई नंतर भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. यामध्ये ते म्हणाले की, ‘ठाकरे सरकारच्या अत्याचाराचा कळस. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदघाटनाच्या चमकोगिरीसाठी कुरारमधील मराठी माणसांची घरे MMRDA ने तोडली. लोकांना प्रचंड मारहाण केली. या विरोधात आवाज बुलंद केल्याबद्दल मला अटक करून आरे पोलीस ठाण्यात नेत आहेत.’
कुरारची कारवाई, ठाकरे सरकारचा अत्याचारी चेहरा दाखवणारी… हायकोर्टाने कोविड काळात घरे तोडण्यास मनाई केली आहे. तरीही पोलिसांनी बेकायदेशीरपणे बळजबरी करून तोडक कारवाई केली.
आम्ही सोमवारी पोलीस आणि इतरांविरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करू.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 17, 2021