बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे भूमिपूजन ढकलले पुढे, जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय !

 

कोकणासह पश्चिम महाराष्ट्र पडणाऱ्या पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच अनेक ठिकाणी दरडी कोसळून अनेकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. कोकणात पुराच्या पाण्यामुळे अनेकांचा संसार वाहून गेला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.

याबाबत घोषणा करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात की, कोकणात पावसाने घातलेला धुमाकूळ व निर्माण झालेली परिस्थिती यामुळे 27 जुलै रोजी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे होणारे भुमिपूजन काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. तारखेची घोषणा लवकरच केली जाईल.दुसऱ्याच्या घरात शोककळा असताना आपल्या घरात आनंद साजरा करावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही.

दरम्यान, महाड येथील तळीये या गावावर पडलेल्या दरडीनंतर येथे सुमारे चाळीसहून अधिक जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे जवळ जवळ संपूण गावच या दरडीखाली नष्ट झाले आहे. परंतु आता म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा नव्याने गाव वसविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन केली होती. त्यानुसार जेवढी घरे यात जमीनदोस्त झाली आहे, तेवढी पक्की घरे पुन्हा उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Team Global News Marathi: