बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द; नव्या सरकारचा अजित पवारांना दणका

पुन्हा एकदा नव्या सरकारने महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे बारामतीतील बिबट सफारीचा प्रकल्प रद्द केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना धक्का दिला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना घेतलेला निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द केला आहे.

महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी बिबट सफारी बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. सुरुवातीला बिबट सफारी, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात टायगर सफारी बारामतीत करण्याचा मानस होता. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी 100 हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती.

तसंच जवळपास 60 कोटी रुपयांची तरतूद केली होती. याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. त्यानंतर बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता सत्ताबदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बिबट सफारी प्रकल्प बारामतीला होणार असल्याचे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला असून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगाव या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

Team Global News Marathi: