“गद्दारी नव्हे धाडस”; आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन भाग पडले आहेत. यानंतर सातत्याने ठाकरेंकडून शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार असं संबोधलं जात होतं. आदित्य ठाकरेंनी या बंडानंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी शिवसंवाद यात्रा सुरू केली. या यात्रेचा पाचवा टप्पा काल रत्नागिरीत पार पडला. यावेळी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी ‘गद्दार’चा गजर केला. त्यावरुन आता उदय सामंतांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

ड्रमायन सामंतांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रत्नागिरीमध्ये काल आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सभा घेतली. या सभेत त्यांनी पुन्हा एकदा ‘गद्दार’ असं संबोधलं. त्यानंतर आता उदय सामंतांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत उदय सामंत म्हणतात, “आमच्या मतदारसंघात येऊन आम्हाला “गद्दार” म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी वंदनीय बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे ठरवले हे योग्य की अयोग्य ते सांगावे. काँग्रेस, एनसीपी बरोबर जाऊ नये हा बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारे पन्नास जण “गद्दार”कसे..ह्याला धाडस म्हणतात.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतून जवळपास ५० आमदार – खासदारांना पक्षातून बाहेर काढलं. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकारही पडलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या समर्थकांकडून सातत्याने शिंदे गटात गेलेल्या नेत्यांना गद्दार असं म्हटलं जात आहे. आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करत आहेत. या दौऱ्यादरम्यान ते सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत.

 

Team Global News Marathi: