‘बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही’ आदित्य ठाकरे यांचा सूचक विधान

 

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आले आहे अशातच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडून आपण शिवसेनेतच आहोत, असं विधान वारंवार करण्यात येत आहे. पण त्यांच्या या विधानाला आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. “काही लोकांकडून आपण शिवसेनेसोबतच आहोत, असं म्हटलं जात आहे. पण हे सगळं खोटं आहे. आता त्यांना पुढची वाट ही भाजपशिवाय पर्याय नाही, असं झालं आहे.

त्यांना आता भाजपात विलिन होण्याशिवाय पर्याय नसेल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? “शिवसेनेचे आमदार गुवाहाटी किंवा कुठे दुसरीकडे असतील त्यापैकी ५० टक्के आमदार आपल्यासोबत आहेत. कारण त्यांना जेवायला चला म्हणून नेलं आणि पुढे कैदी म्हणून ठेवलं आहे. ही लढाई पुढे कशी जाईल याचा आपल्या कुणालाही अंदाज नाही.

खरं बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी बंडाची कुरबूर ऐकली होती. तेव्हा त्यांनी सर्व आमदारांना बोलावून घेतलं होतं आणि सांगितलं होतं. तुम्हाला जर मुख्यमंत्रीपद हवं असेल तर तुम्ही मला समोर येऊन सांगा. तुम्हाला मुख्यमत्री बनवून देतो. सगळं वेगळं चित्र उभं केलं आहे. रुसवे फुगवे असतील तर हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून सांगितलं असतं. सूरत आणि गुवाहाटीत पळून जावून काय होणार होतं? पक्षप्रमुखांसोबत बोलायचं होतं. आता आपल्याला पुढे लढायचं आणि जिंकत जायचं आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: