बहृन्मुंबई महानगरपालिका व मे. आय डी ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सामंजस्य करार

 

मुंबई | मुंबईसाठी नि:क्षारीकरण प्रकल्प  सुरु करणे हे महत्वाचेच नाही तर क्रांतीकारी पाऊल असून आज आपल्या अनेक वर्षाच्या स्वप्नाला मूर्त रुप येत असल्याचे पाहून आनंद वाटत आहे असे प्रातिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत  सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि.  यांच्यादरम्यान २०० दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठीचा सामंजस्य करार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतू त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना  किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात  घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण  करण्याचा प्रकल्प आता मुर्त रुपाला येत आहे.

तसेच  २०२५ पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. शेवटी विकास करतांना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी आज मलाड येथे उभ्या करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालय तसेच  कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पणातून मुंबईकरांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती दिली.

नगर विकास विभागाचे पूर्ण सहकार्य अवेळी पडणारा पाऊस, पाण्याची वाढती मागणी पहाता नि:क्षारीकरण प्रकल्पासाठीचा सामंजस्य करार करून आज महापालिकेने महत्वाचे पाऊल टाकल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

Team Global News Marathi: