खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक मंत्र्यांनी गाडी घालून उद्ध्वस्त करणं निषेधार्ह – प्रवीण दरेकर

 

पुण्यातील शिवछत्रपती क्रिडा संकुलात धावपटूंसाठी तयार केलेल्या रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या उभ्या करण्यात आलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गाड्यावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता याच मुद्द्याला पकडून विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घणाघाती टीका केली आहे.

“राज्यातील क्रिडा संकुलांची देखभाल नीट करण्याची गरज असताना महाविकास आघाडी मधील नेते व मंत्री पुणे येथील शिवछत्रपति क्रिडा संकुलातील रेस ट्रॅकवर गाड्या उभ्या करून खेळाडूंच्या भविष्याचा ट्रॅक उद्ध्वस्त करत आहेत, त्यांची ही कृती निषेधार्ह आहे,” अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले, “राज्यात अगोदरपासूनच क्रीडा सुविधा कमी आहेत त्यामुळे त्या ट्रॅकची नासधूस करू नये. रेस ट्रॅकवर व्हीव्हीआयपी गाड्या आणताना काळजी घेण्याची आवश्यकता होती. महाराष्ट्रात स्पोर्ट्सचं वैभव आहे. त्या ट्रॅकवर स्पर्धक ऑलिंपिकसाठी सराव करतात, स्वतःचे आणि देशाचे भविष्य घडवत असतो. महाविकास आघाडी सरकारकडून एक दीड वर्षात स्पोर्ट्सला चालना देण्यात आली नाही. ट्रॅकवरून गाड्या नेणे म्हणजे खेळाडूंसाठींच्या पवित्र वास्तुचा अवमान करण्यासारखं आहे. त्यामुळे यांचा मी निषेध व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली.”

Team Global News Marathi: