अयोध्या | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल अयोध्या दौऱ्यावर गेले आहे आता त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अयोध्यात दाखल झाले असून या दोघांचे अयोध्या नगरीत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. दोनच दिवसांपूर्वी मोठ्या संख्यने शिवसैनिक विशेष ट्रेनने अयोध्येत दाखल झाले होते. सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची अयोध्येत रॅली सुरु झाली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंबोबस्त तैनात करण्यात आला आहे.
यावेळी सर्वत्र भगवं वातावरण झालं असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे सर्वजण अतिशय खुश आणि आनंदी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आमचं जंगी स्वाग केल्याबद्दल अयोध्येतील जनतेचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. सर्वच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. राम जन्मभूमित उत्साह असतोच असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. हा उत्साह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिंदुत्ववादी सरकार राज्यात आल्याचा उत्साह असल्याचे फडणवीस म्हणाले.
आज आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर प्रभु रामचंद्राचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येला आलो आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचेही अयोध्येत राम मंदिर व्हावं हे स्वप्न होतं. यासाटी बाळासाहेब ठाकरेंनी आवाज उठवल्याचे देसाई म्हणाले.
सध्या राम जन्मभूमीत मोठ्या उत्साहाचं वातावरण असल्याचे देसाई म्हणाले. आज खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंना आत्मिक समाधान लाभत असेल असे देसाई म्हणाले. आम्ही एकनाथ शिंदे यांना आग्रह केली की, आता आपण अयोध्येला जाऊ या असे देसाई म्हणाले. महाराष्ट्र हे देशातील एक नंबरचे राज्य व्हावं, देशात सगळ्यात सुजलाम सुफलाम् राज्य असावं, कोणतंही संकट येऊ नये अशी प्रभू रामाच्या चरणी मागणी असल्याचे देसाई म्हणाले.