‘पावनखिंड’चा बॉक्स ऑफिसवर बोलबाला; १० दिवसात कोटींची कमाई

 

मुंबई | काही दिवसांपूर्वी चित्रपट गृहात प्रदर्शित झालेला ‘पावनखिंड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर यशाची घोडदौड करताना दिसून येत आहे. १८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना भावला आहे. लेखक – दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईबद्दल एक ट्विट केले आहे.

यात त्यांनी मराठा योद्ध्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘पावनखिंड’नं बॉक्स ऑफिसवरच्या कमाईबद्दल पोस्ट शेअर केली आहे. “मराठी चित्रपट पावनखिंड हा हिट ठरला आहे. सदर चित्रपटात भिनेता चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, अंकित मोहन यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे.

दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाची घौडदौड कायम आहे. पहिला आठवडा – १२.१७ कोटी, आठवड्याच्या शेवटी – शुक्रवार १.०२ कोटी, शनिवार १.५५ कोटी, रविवार १.९७ कोटी.. एकूण – १६.७१ कोटी”, असे तरण आदर्श या पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्या हा चित्रपट महाराष्ट्राबाहेर सुद्धा प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून घेत आहे.

Team Global News Marathi: