युक्रेनहून परतलेल्या १८२ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नारायण राणे विमानतळावर

 

युक्रेन आणि रशिया युद्धदरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत मंगळवारी सकाळी मुंबई विमानतळावर १८२ विद्यार्थी दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विमानतळावर हजेरी लावली.

विद्यार्थी विमानातून उतरण्यापूर्वी नारायण राणे यांनी विमानात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांना युक्रेनहून परत आणण्याच्या मोहीमेवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. गेल्यावेळी युक्रेनहून मुंबईत विमान आले तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही विमानतळाबाहेर उपस्थित होते.

दरम्यान ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत आतापर्यंत युक्रेनहून ६०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अजून अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल तिकडे सुरु आहेत. यासाठी भारत त्यांना मायदेशी आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे.

Team Global News Marathi: