वयाच्या 46 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, जुळ्या मुलांना दिला जन्म

वयाच्या 46 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, जुळ्या मुलांना दिला जन्म

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ म्हणजेच प्रीति झिंटाने आपल्या चाहत्याना एक आनंदाची बातमी दिली आहे. वयाच्या 46 व्य वर्षी ही अभिनेत्री जुळ्या मुलांची आई झाली आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिने ही बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या जुळ्या मुलांची नावे देखील सांगितली आहेत. तिच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

ही पोस्ट शेअर करताना प्रीतीने कॅप्शनमध्ये लिहिले- ‘सर्वांना नमस्कार, मला तुमच्या सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करायची आहे. जीन आणि मी खूप आनंदित झालो आहोत आणि इतक्या प्रेमाबद्दल आमचे अंतःकरण कृतज्ञतेने भरले आहे, कारण आज आम्ही आमच्या कुटुंबात जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ या जुळ्या मुलांचे स्वागत करतो. आम्ही आमच्या आयुष्याच्या या भागाबद्दल खूप उत्सुक आहोत. या अद्भुत प्रवासासाठी डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे आभार. भरपूर प्रेम. जीन, प्रीती, जय आणि जिया

दरम्यान, अभिनेत्री प्रीति झिंटाने तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान जीन गुडइनफसोबत गुपचूप लग्न केले होते. फेब्रुवारी 2016 रोजी लॉस एंजलसमध्ये अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला होता. लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली आहे. प्रितीने शेअर केलेल्या पोस्टवर जगभरातील चाहते या जोडप्याला मुलांच्या जन्माबद्दल शुभेच्छा देत आहेत आणि कमेंट सेक्शनमध्ये त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: