अर्जुन कपूरनं खरेदी केली इतक्या कोटीची आणखी एक महागडी कार

 

मुंबई | चित्रपट सृष्टीतील अनेक बड्या कलाकारांकडे अनेक महागड्या गाड्या आहेत त्यात आणखी एका अभिनेत्याच नाव ऍड झालं आहे. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्री मलायका अरोरासोबतच्या नात्यामुळं चर्चेत राहणा-या अर्जुननं आता एक महागडी कार खरेदी केली आहे. अर्जुनच्या या अलिशान लक्झरी कारची किंमत कोटींच्या घरात आहे.

अर्जुनकडे आधीच ऑडी क्यू ५, होंडी सीआर-व्ही, लँड रोव्हर अशा महागड्या गाड्या आहेत. आता त्याने नवीकोरी Maybach GLS600 SUV ही गाडी खरेदी केली आहे. तिची किंमत २.४३ कोटी रूपये आहे. खास गोष्ट म्हणजे, अर्जुनच्या या नव्या एसयुव्हीचा नंबर. त्याच्या गाडीचा नंबर आहे ०२९११. हा नंबर अर्जुनसाठी खास आहे. आता त्यांच्या ताफ्यात आंही एक महागडी कार सामील झाली आहे.

अर्जुन कपूरआधी ही एसयुव्ही रणवीर सिंगने खरेदी केली होती आणि रणवीर या कारमध्ये अर्जुनला राईडवर घेऊन गेला होता. कदाचित तेव्हापासूनच ही कार घ्यायचीच असं अर्जुनने ठरवलं असावं. आता या नव्या को-या अलिशान एसयुव्हीमधून अर्जुन सर्वप्रथम आपल्या बहनीला की आपली प्रेयसी मलायका अरोरा हिला घेऊन राईडवर जातो हे पाहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: