चंद्रपुरात गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला फासण्यात आलं काळ आणि चपलेने बडवत !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून आघाडी सरकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर सतत टीका करत असताना दिसून आले आहेत. त्यात OBC आरक्षणाच्या मुद्द्यांवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केलेल्या टीकेचा आता काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौकात सोमवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्याचे पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालक मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर खोटेनाटे आरोप करणाऱ्या भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे, चपलांनी चोप देण्यात आला.तसेच तोंडाला काळे फासून निषेध नोंदविण्यात आला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या रूपाने जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळाले आहे. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून राज्यात उल्लेखनीय काम केले आहे. मात्र, मंत्री विजय वडेट्टीवार यांचे काम विरोधकांच्या डोळ्यात खुपत आहे.

आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कोणतेही पुरावे न सादर करता खोटे आरोप करून बदनामी करण्याचे षड्यंत्र रचले आहे. वडेट्टीवार यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्या -या आमदार पडळकर यांच्याविरोधात राज्यातील बहुजन समाज आणि काँग्रेस प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच गोपिचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांची माफी मागावी अशीही मागणी करण्यात आली.

Team Global News Marathi: