अण्णा हजारे जागते रहो | झोपी गेलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी आंदोलन”

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जनतेच्या हितासाठी अनेक प्रकारची उपोषण यापुर्वी केली आहेत. या उपोषणाद्वारे सरकारला जाब ही विचारले आहेत. मात्र गेले कित्येक दिवस जनता महागाईने होरपळत असताना अण्णा हजारे कोणतीच भुमिका घेताना दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांच्याविरोधात राळेगणसिद्धीमध्ये आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद यांनी दिला आहे.

मागील दोन लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात झोपी गेलेल्या अण्णा हजारेंना उठवण्यासाठी ‘अण्णा उठो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.

घरगुती वापराच्या एलपीजी गॅसची दरवाढ, इंधनासह खाद्यतेलाची होत असलेली दरवाढ, त्यातच खाद्यान्नांची होत असलेली दरवाढ यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. महागाई विरोधात सर्वसामान्यांमध्ये मोठा आक्रोश असून सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. जनता महागाईत होरपळत असताना अण्णा हजारे शांत कसे काय आहेत, असा सवालही त्यांनी केला.

Team Global News Marathi: