अंधेरी पोटनिवडणूक रद्द करण्याची ‘या’ उमेदवाराची मागणी

अंधेरी पोटनिवडणूकीत नवीन वळण आले आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारारीत त्यांनी गंभीर आरोप करत त्यांनी थेट निवडणुक रद्द करण्याची मागणी केली आहे. अंधेरी पोटनिवडणूक सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे चर्चेत आली आहे. त्यातच आता अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे आणखी ट्विस्ट आला आहे.
अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप कांबळे यांनी केला आहे. कांबळे यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कांबळे यांनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवर सात दिवसांच्या आत प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे. मिलिंद कांबळे यांच्या या तक्रार अर्जावर निवडणूक अयोग्य काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणुक पार पडत आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीत दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली. भाजपचे मुरली पटेल यांना ऋतुजा लटके यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र, ऐन वेळी भाजपने आपला उमेदवार मागे घेतला. मात्र तरीही ऋतुजा लटके यांच्या विरोधात आणखी सहा उमेदवार निवडणुक लढवत आहेत.
Team Global News Marathi: