ट्विटर डिलवर राहुल गांधींनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले की,

 

इलॉन मस्क यांनी ट्विटरचे तब्बल ४४ अब्ज डॉलर्सचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘पक्षी मुक्त झाला आहे,’ असे ट्वीट करीत आनंद व्यक्त केला. यासाठी त्यांनी टेस्लाचे काही शेअर्स १५.५ अब्ज डॉलर्सला विकले तर १३ अब्ज डॉलर्सचे कर्जही काढले. आता ट्विट मस्क यांच्या मालकीचे झाले आहे. या करारानंतर, ट्विटर देशातील नवीन आयटी नियमांचे पालन करेल अशी आशा भारताने व्यक्त केली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही ट्विटर आता द्वेषयुक्त भाषणांवर कारवाई करेल, अशी आशा व्यक्त केली.

ट्विटर डीलनंतर राहुल गांधी यांनी इलॉन मस्क यांचे अभिनंदन केले. “अभिनंदन इलॉन मस्क. मला आशा आहे की ट्विटर आता द्वेषयुक्त भाषणावर कारवाई करेल. वस्तुस्थिती अधिक कठोरपणे तपासली जाईल. आता सरकारच्या दबावामुळे भारतातील विरोधकांचा आवाज दाबून चालणार नाही. यासोबतच राहुल गांधींनी त्यांच्या फॉलोअर्सच्या वाढीचा आलेखही शेअर केला आहे.

राहुल गांधी यांनी बलात्कार पीडितेचा फोटो शेअर केल्यानंतर आणि राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाकडून नोटीस मिळाल्यानंतर त्यांचे ट्विटर हँडल तात्पुरते बंद करण्यात आले होते. त्यामुळे राहुल गांधी काही काळ ट्विटर वापरू शकले नाहीत. यासोबतच राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटर हँडलचा आलेखही शेअर केला आहे.

राहुल गांधींनी शेअर केलेल्या ग्राफमध्ये जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२१ या कालावधीत त्यांच्या फॉलोअर्समध्ये वाढ होत होती. ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यांच्या फॉलॉअर्सची वाढ थांबली होती. यावर राहुल गांधी यांनी दावा केला आहे की, ट्विटरने त्यांच्या अकाऊंटशी छेडछाड केली आहे. मात्र, फेब्रुवारी २०२२ नंतर त्यांचे फॉलोअर्स पुन्हा वाढू लागले.

Team Global News Marathi: