आनंद वार्ता: पवना धरण 100 टक्के भरले

ग्लोबल न्यूज– पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणारे आणि मावळ तालुक्यातील प्रमुख असलेले पवना धरण 100 टक्के भरले. धरणात सध्या 272.11 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. भीमा नदी खोरे प्रकल्पातील पाच धरणे 100 टक्के भरली आहेत.

पवना धरणात सध्या 240.96 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 8.51 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. तर 31.15 दशलक्ष घनमीटर एवढा अचल पाणीसाठा आहे. धरणात एकूण 272.11 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा सध्या आहे. धरण 100 टक्के भरले आहे.

पवना धरण क्षेत्रात शनिवारी (दि. 4) 29 मिलिमीटर पाऊस पडला. एक जून पासून पवना धरण क्षेत्रात 2 हजार 215 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. मागील वर्षी चार सप्टेंबर पर्यंत 1 हजार 595 मिलिमीटर पाऊस पडला होता. पवना धरणातून सध्या पावर हाउससाठी 1 हजार 326 क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

भीमा नदी खोरे प्रकल्पातील 26 धरणांपैकी कळमोडी, आंद्रा, पवना, नीरा देवधर ही पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर चासकमान, भामा आसखेड, कासारसाई, टेमघर, पानशेत, गुंजवणी, भाटघर ही सात धरणे 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भरली आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: