‘माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली’ ; करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर आरोप

परळी : दि.5 : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद काही महिन्यांनतर पुन्हा एकदा विकोपाला गेला आला आहे. करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर लावलेल्या आरोपांचे पुरावे सादर करण्यासाठी परळीत पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या परळीत पोहचल्या. मात्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच त्यांना त्यांच्या मुलासह परळी पोलिसांनी स्थानबद्ध केले.

करुणा मुंडे यांच्या इनोव्हा गाडीची (एमएच 04 एच एन 3902) परळी शहर पोलीसांनी तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिक्कीत एक पिस्टल सापडला आहे. सदरील पिस्टलचा परवाना आहे की नाही. याचा तपास पोलीस करत आहेत.

परळी शहर पोलीस ठाण्याचे सपोनि.नारायण गित्ते यांनी या गाडीची पाहणी केली असून पुढील तपास ते करत आहेत. करुणा मुंडे यांच्या गाडीत पिस्टल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
.

दरम्यान आता एका वृत्तवाहिनीला करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली यावेळी त्या म्हणाल्या कि, ‘धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केली. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि दबाव टाकून माझ्या गाडीत रिव्हाल्वर टाकली आणि माझ्या वरील खोटे गुन्हे दाखल केले आहे. धनंजय मुंडे यांनी जोर जबरदस्ती बळाचा वापर केला आहे, असा आरोप करून मुंडे यांनी केला आहे.

दरम्यान, करुणा मुंडेंच्या गाडीत बेकायदेशीर पिस्तुल आढळल्याने त्यांच्या मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्या कुटुंबीयांचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय धनंजय मुंडे समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे परळी शहरातील शेकडो महिला रस्त्यावर उतरल्या असून शहर पोलीस ठाण्यासमोर दाखल झाल्या आहेत. या महिलांनी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी तर केलीच, पण आज थेट धनंजय मुंडे यांना संपवण्यासाठी डाव आखला असल्याचा आरोप करत करुणा मुंडे यांना अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: