अमृता फडणवीस यांचे नाव गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला पुण्यात दिली माहिती !

 

राज्य सरकारकडून २६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेले निर्बंध हटवले असून रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने खुली करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, वगळण्यात आलेल्या ११ जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने पुण्याचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील व्यापारी सरकारवर नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत प्रशासन व राज्य सरकारला प्रश्न विचारले आहेत. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर उत्तरं देताना आपल्या नवीन गाण्याची घोषणाही केली होती.

अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना नव्या गाण्यासंदर्भात माहिती दिली.

अमृता फडणवीस या प्रोफेशनली गायिका असून यापूर्वीही त्यांची अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आपल्या गाण्यांमधून सामाजिक विषयांवरही त्यांनी भाष्य केलं आहे. आता, तुमचं पुढचं गाणं कधी? असा प्रश्न अमृता यांना विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी माहिती दिली. गणेश चतुर्थीच्या अगोदर माझं नवीन गाणं येतंय, हेही अमृता यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करून खरेदी करावी. राज्यात अनेक ठिकाणी नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे तिथे व्यवहार सुरू झाले आहेत. पुण्यात फक्त ४ टक्के रुग्णसंख्या असतानाही पुणे खुलं का झालं नाही? मुंबईतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, तर पुण्यातील का नाही? त्यासाठी तुम्ही धरणे धरायला पाहिजे”, असं आवाहन अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना केलं

Team Global News Marathi: