अमित शहांच्या चॅलेंजनंतर उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक ?

 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना शाखाप्रमुखांची बैठक बोलावली आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात महापालिकेसाठी रणशिंग फुंकले. यावेळी 150 जागांचे टार्गेट भाजपने ठेवले आहे. त्यानंतर आज लगेच शिवसेनेच्या विभागप्रमुखांची मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि विभाग महिला संघटक यांची मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. पालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन केले आहे. अमित शहा यांनी केलेले वक्तव्य आणि भाजपकडून सुरू असलेली तयारी याचाही आढावा या बैठकीत घेतला जाईल.

दरम्यान, अमित शहा यांनी युती तोडण्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता.
त्यांच्या या टीकेला शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कोण कोणाला धोका देतंय, खोके देतंय, कोण कोणाचे बोके पळवतंय हे सगळं लोकांना दिसतंय. अमित शहांची अवस्था गजनी सारखी काझाली? अडिच वर्षांनंतर दोन जागांसाठी युती तोडली हा साक्षात्कार का झाला?
असा सवाल पेडणेकर यांनी केला.

Team Global News Marathi: