बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का?, निलेश लंकेचा भाजपला सवाल

 

भारतीय जनता पक्षाने मुंबईसोबतच आपला मोर्चा पवारांच्या बारामतीकडे वळवला आहे. काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत येऊन शरद पवार यांना आवाहन दिलं होत. बारामतीसह लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचं भाजपचं टार्गेट आहे, असं बावनकुळे म्हणाले. याआधी अनेक गड उद्धवस्त झाल्याचं सूचक वक्तव्य बावनकुळे यांनी यावेळी केलं. बावनकुळे यांच्या याच वक्तव्याला राष्ट्रवादी आमदार निलेश लंके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बारामतीचा गड उध्वस्त करणं इतकं सोपं वाटतं का? कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयोग होता, असं म्हणत आमदार निलेश लंके यांनी भाजपवर पलटवार केला आहे.आमदार निलेश लंके यांनी भाजपला लक्ष्य करताना, “वक्तव्य करण सोपं असतं, कृती करणं अवघड असतं, ज्या बारामतीनं देशाला विकासाची दिशा दाखवली. राज्यात प्रत्येक झोपडीपर्यंत विकास पोचविण्याचं काम केलं. त्या बारामतीचा गड उध्वस्त करणं, हे इतकं सोपं वाटतं का? असा सवाल केला.

तसेच, फक्त बोलायचं म्हणून बोलायचं. कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनेक गड उध्वस्त झालेत, असा सूचक इशारा शरद पवार यांना दिला होता. तर पुढे बोलताना येत्या विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं विसर्जन करायचं आहे, असं वक्तव्यही त्यांनी केलं होतं. या वक्तव्याबाबत लंके यांनी बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

Team Global News Marathi: