आमिरचा ‘लाल सिंह चढ्ढा’, साऊथ सुपरस्टार नागार्जुननं शेअर केलं खास ट्विट

 

अभिनेता आमिर खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चढ्ढामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचं पहायला मिळतोय. सोशल मीडियावर लाल सिंग चड्ढा चित्रपटावर बहिष्कार टाकण्यात यावा असं सुरू आहे, तरीही ही जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग दिसून येत आहे.

चित्रपटातील काही जुन्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चित्रपट वादात सापडलाय. अशातच लाल सिंह चढ्ढाविषयी दाक्षिणात्य सुपस्टार अभिनेता नागार्जुननं प्रतिक्रिया दिली आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपटाच्या काही स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आल्या होत्या. एसएस राजामौली, नागार्जुन, सुकुमार आणि चिरंजीवी यांसारख्या दिग्गज कलाकारांसाठी या विशेष स्क्रिनिंग होत्या.

हा चित्रपट पाहिल्यानंतर नागार्जुननं प्रतिक्रिया दिली आहे. नागार्जुननं ट्विटरवर हा चित्रपट कसा वाटला याविषयी पोस्ट शेअर केली आहे. ट्विट करत नागार्जुननं म्हटलं की, ‘लाल सिंह चढ्ढा’ चित्रपट पाहिल्यानंतर मोकळ्या हवेत श्वास घेतल्यासारखं वाटलं. साधा आणि सरळ वाटणाऱ्या या चित्रपटाचा अर्थ खूप खोल आहे. हा चित्रपट तुम्हाला हसवतो, रडवतो आणि विचार करायला भाग पाडतो.

नागार्जुननं ट्विटमध्ये पुढे म्हटलं की, या चित्रपटातून एक साधा मेसेज मिळतोय की, प्रेम आणि निरागसतेनं जग जिंकता येतं. याशिवया नागार्जुननं त्याचा मुलगा नागा चैतन्यची कौतुक केलं आहे.

Team Global News Marathi: