राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्याराशीसाठी

Today Horoscope 9 August 2022 : आज चंद्र गुरुच्या धनु राशीत असेल, तर गुरु स्वतः मीन राशीतून चंद्रापासून चौथ्या स्थानी असेल. दोन्ही चंद्र आणि गुरू एकमेकांच्या केंद्रस्थानी असल्याने पुढे जाऊन गजकेसरी योग तयार करतील. तसेच आज मूल आणि पूर्वाषाढ नक्षत्राचा प्रभाव राहील. सूर्य आणि शुक्र सहाव्या आणि आठव्या स्थानी चंद्राशी संयोग साधतील. ग्रह आणि नक्षत्रांच्या या स्थितीमुळे तुमचा दिवस कसा जाईल. आज तारे काय म्हणतात ते पाहा.

मेष रास:

मेष राशीच्या लोकांनी आज सर्व कामे स्वतःवर विश्वास ठेवून केली तर तुम्हाला फायदा होईल. अधिक नफा मिळविण्यासाठी तुम्हाला कौटुंबिक व्यवसायात भाऊ-बहिणींचे सहकार्य मिळेल आणि त्यांना मदत करण्यासही तयार असाल. मित्रांच्या मदतीने अवघड कामे सोपी होतील. आज तुम्हाला घरगुती वस्तूंची खरेदी करावी लागेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यश मिळेल. आज ८०% नशिबाची साथ आहे. हनुमान चालिसा वाचा.

​वृषभ रास:

वृषभ राशीच्या लोकांना आज चांगली माहिती मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. घरातील जबाबदार्‍या पार पाडण्याच्या दिशेने काही नवे निर्णय घेता येतील. व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही चांगली कामगिरी कराल. वडिलांच्या सहकार्याने तुमचे काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांना तुमचा हेवा वाटू शकतो. आज ८६% नशिबाची साथ आहे. हनुमानाला चोळ अर्पण करा.

​मिथुन रास:

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या मनात काही असेल तर ते तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, ज्यामुळे परिस्थिती सुधारेल. महिलांनी त्यांच्या करिअरबाबत अधिक खोलवर विचार करण्याची गरज आहे. मालमत्ता खरेदीसाठी दिवस अतिशय अनुकूल आहे. मात्र पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. आज ८५% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करा आणि मंगळवारी व्रत ठेवा.

​कर्क रास:

आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या व्यक्तिमत्त्वात नवीन आकर्षण निर्माण होईल. आपल्या कौशल्याने आणि समंजसपणाने कामे पूर्ण कराल आणि अधिकाऱ्यांकडून कौतुकही होईल. अधिकाऱ्यांसमोर आपले म्हणणे मांडण्याचीही हीच योग्य वेळ आहे. आज व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची चांगली बातमी मिळेल. आज ८४% नशिबाची साथ आहे. गणेशाची आराधना करा.

​सिंह रास:

सिंह राशीच्या लोकांनी आज कोणाचेही म्हणणे मनावर घेऊ नका आणि कामावर लक्ष केंद्रित करा. नोकरी शोधणाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. व्यवसायात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि उत्कृष्ट परिणाम प्राप्त होतील. कौटुंबिक शक्तीच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले परिणाम देतील. आज ७६% नशिबाची साथ आहे. हनुमानासमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा.

कन्या रास:

कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. कापड आणि धातूंच्या व्यवसायात आज चांगला फायदा होईल. भविष्य लक्षात घेऊन कोणतीही गुंतवणूक करा. सासरच्या लोकांशी चांगली चर्चा होईल आणि संबंध अधिक दृढ होतील. कोणतेही जबाबदारीचे काम करताना निष्काळजीपणा करू नका. आज ७२% नशिबाची साथ आहे. भगवान विष्णूची पूजा करा.

​तूळ रास:

तूळ राशीच्या लोकांना आज कामात चांगल्या संधी मिळू शकतात. कौटुंबिक व्यवसायात जोडीदाराचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. सरकारी नियमांमुळे व्यापार्‍यांना काही अडचणी येऊ शकतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही नवीन मित्र बनवू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता अधिक मेहनतीची गरज आहे. आज ९०% नशिबाची साथ आहे. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

वृश्चिक रास:

वृश्चिक राशीच्या लोकांना आज अज्ञात स्त्रोताकडून धन मिळू शकते. नवीन प्रोजेक्टवर काम करून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळतील. पालकांसोबत खरेदीला जाता येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी मिळेल. आज ८२% नशिबाची साथ आहे. सुंदरकांडचे वाचन करा.

​धनु रास :

धनु राशीच्या लोकांसाठी आज तुमचे कुटुंब आणि कामाचे ठिकाण तुमच्या सकारात्मक विचारांनी आनंदी असेल. बँकिंग क्षेत्रातील लोकांना नोकरीत लाभाचा काळ आहे. प्रलंबित राहिलेला मालमत्ता व्यवहार आता फायदेशीर वाटू शकतो. मुलांकडून मनाला समाधान मिळेल. जोडीदारासोबत मिळून काही योजना कराल. आज ७०% नशिबाची साथ आहे. मंगळवारी उपवास ठेवा आणि हनुमान चालिसाचे पठण करा.

​मकर रास:

मकर राशीच्या लोकांच्या देवाच्या कृपेने आज अनेक गोष्टी घडू शकतात. जोडीदाराच्या मदतीने संपत्ती प्रकरणात लक्ष घालू शकाल. सासरच्या मंडळींचे पूर्ण सहकार्य मिळेल. वेळेचा सदुपयोग केल्याने तुम्हाला फायदा होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. घरातील महत्त्वाच्या कामात मदत होईल. आज ७९% नशिबाची साथ आहे. हनुमानाची पूजा करावी.

​कुंभ रास:

आज सकाळपासून तुम्हाला उत्साही वाटेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. एखाद्या विशिष्ट विषयाबद्दल तुमचे विचार बदलू शकतात. तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या काही चांगल्या संधीही मिळू शकतात. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये यश मिळेल आणि मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आज ९५% नशिबाची साथ आहे. सूर्यदेवाला पाणी अर्पण करा.

मीन रास:

मीन राशीचे लोकं आज नवीन कामात रस घेतील आणि मित्रांसोबत राहायला आवडेल. तुमच्या पराक्रमाच्या आणि धैर्याच्या जोरावर तुम्ही पैसे कमवू शकाल. तरुणांना करिअरशी संबंधित नवीन माहिती मिळेल, त्यावर ते आपली तयारी पूर्ण करतील. भूतकाळात घडलेल्या घटनांमुळेच वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जा. आज ८१% नशिबाची साथ आहे. हनुमानजींना बुंदी अर्पण करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: