अमरनाथ घटनेवर अभिनेता अक्षय कुमारने व्यक्त केलं दुःख

 

जम्मू-काश्मीरमधील अमरनाथ गुहेच्या काही किलोमीटर अंतरावर शुक्रवारी संध्याकाळी अचानक झालेल्या ढगफुटीमध्ये अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखाली NDRF, SDRF आणि ITBP च्या टीम बचावकार्यात उतरल्या आहेत. या घटनेवर शोक व्यक्त करत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केले आहे.

अक्षय कुमार आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की, अडकलेल्या भाविकांसाठी प्रार्थना केली आहे.अचानक घडलेल्या या घटनेने लोक अस्वस्थ झाले आहेत. अमरनाथमधील या दुःखद घटनेनंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. अभिनेत्याने ट्विट करत लिहलंय, ‘बालटालमध्ये अमरनाथ मंदिरातील पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर झालेल्या जीवितहानीमुळे खूप दुःख झालं.

अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी IMD हवामानाबाबत विशेष सूचना जारी करते. शुक्रवारी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला होता. अमरनाथ यात्रेच्या वेबसाइटवर संध्याकाळी 4.07 पर्यंत हवामान अंदाजानुसार, पहलगाम आणि बालटाल या दोन्ही बाजूच्या मार्गांसाठी “अंशत: ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा” अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र अचानक झालेल्या ढगफुटीने लोक हादरून गेले आहेत.

Team Global News Marathi: