मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

 

नवी दिल्ली | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी दोन्ही नेत्यांनी घेतल्या. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तेथे चर्चा होईल यांची शक्यता वर्तवली जात होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी नंतर करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदेनी दिली आहे.

तसेच उद्या आषाढी एकादशी झाली की मी आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत भेटून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करु. त्यानंतर आपल्या मनातील प्रश्नाचं उत्तर लवकरच देऊ. अधिवेशनाआधी मंत्र्यांचा शपथविधी होईल,शिंदे-फडणवीस अमित शाहंच्या भेटीला, मंत्रिमंडळाच्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब! राज्यात एका विचारातून या सगळ्या घडामोड झाल्या आहेत. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर या सदिच्छा भेटी होत्या.हा राजकिय दौरा नाही. लोकांच्या मनात होतं तसं सरकार राज्यात स्थापन झालं आहे. वरिष्ठ नेत्यांच्या सदिच्छा भेटीला आम्ही कालपासून आलो आहोत. लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी हे सरकार आहे.

राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या मदतीचा देखील आवश्यक आहे. पंतप्रधान नरेद्र मोदींचं महाराष्ट्रासंबंधीचं व्हीजन समजून घेणार आहोत. केंद्राजी मदत मिळाल्यास राज्य वेगाने प्रगती करतं, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. ‘ही गद्दारी नाही तर क्रांती; आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं…’; बंडखोरीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान महाराष्ट्रातील घडामोडींची देशाने नव्हे तर जगाने दखल घेतली. बहुमताचे स्थिर सरकार राज्याला मिळाले आहे. शिवसेना-भाजप युतीचं सरकार अडीच वर्षापूर्वी व्हायला पाहिजे, ते आम्ही स्थापन केलेय. आम्ही आमचं काम करत राहू, कुणी काही बोललं तरी आमच्यावर काही परिणाम होणार नाही.

Team Global News Marathi: