अक्षयच्या दुःखात सहभागी झाली शिल्पा शेट्टी, घरी जाऊन घेतली भेट !

 

मुंबई | अभिनेता कश्या कुमार यांच्या आईचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले होते. आईच्या निधनामुळे अक्षयवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अरुणा भाटिया यांची प्रकृती काही दिवसांपासून ठीक नव्हती. मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. मुंबईत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी काही बॉलिवूड सेलिब्रिटीही उपस्थित होते.

त्यातच अक्षयला धीर देण्यासाठी अनेक कलाकारांनी अक्षयच्या घरी हजेरी लावली होती. अक्षयची जुनी मैत्रीण आणि प्रेयसी राहिलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी रात्री अक्षयच्या घरी गेली होती. अभिनेता रितेश देशमुख, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, मलायका अरोरा, अर्जून कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, चंकी पांडे तर आता शिल्पाने ही जवळचा मित्र अक्षयच्या दुःखात सहभागी होण्यासाठी त्याच्या घरी हजेरी लावली होती.

सध्या पॉर्नफ्लीम प्रकरणी शिल्पाचा पती राज कुंद्रा पोलिसांच्या ताब्यात असून सुद्धा अशा वेळीही तिने अक्षयच्या दुःखात सहभागी होत त्याला भेट दिली. याशिवाय नुकतंच शिल्पाच्या घरी गणपती बाप्पाच आगमन झालं आहे. यावेळी राज कुंद्रा नसताना शिल्पाने एकटीनेच बाप्पाला घरी आणलं आहे.

Team Global News Marathi: