केंद्र सरकारने EDचा कितीही गैरवापर केला तरीही महाराष्ट्रातलं सरकार भक्कम !

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील अनेक मंत्र्यांच्या मागे ED ची चौकशी लागली होती. त्यातच काहींच्या घरावर आणि कार्यालयावर धाडी सुद्धा टाकण्यात आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारला टोला लगावला होता.

केंद्रातील मोदी सरकारकडून ईडीचा गैरवापर केला जातो आहे. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना विनाकारण आकसापोटी त्रास दिला जातो आहे. याद्वारे महाराष्ट्रातलं सरकार डळमळीत करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याने काही फरक पडणार नाही महाराष्ट्रातलं सरकार भक्कम आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ED चा गैरवापर होतो आहे का? याबद्दल काय सांगाल? काही लोक असं म्हणतात की काँग्रेसच्या काळातही अशाच प्रकारे विरोधकांना त्रास दिला गेला, असं तुम्हालाही खरंच वाटतं का? असा प्रश्न इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांनी विचारला. त्यावेळी शरद पवार यांनी याबाबत उत्तर दिलं.

शरद पवार म्हणाले, ‘काँग्रेसच्या कालखंडात काही गोष्टी झाल्या असतील मात्र आज ज्या पद्धतीने कसा वापर केला जातो आहे ईडीचा पाहा.. काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण पाच एक वर्षांपूर्वी ED काय आहे हे आम्हाला माहित नव्हतं. ईडीची फारशी चर्चा नव्हती. सीबीआयकडे केस जाईल, सीबीआय तपास करेल असं लोक तेव्हा म्हणायचे. ईडी काय आहे ते आम्हाला माहित नव्हतं. ही ईडी आत्ता आली आहे. या ईडीचा पुरेपूर वापर करून काही लोकांची चौकशी झाली, काही जणांना अटक करण्यात आली. विशेषतः मान्यवर म्हणून जे ओळखले जातात त्यांना सगळ्यांनाच ईडीने बोलावलं. हा ईडीचा सरळसरळ गैरवापर आहे असे पवारांनी या मुलाखतीत म्हणून दाखविले होते.

Team Global News Marathi: