अजित पवारांवर वेब सीरिज केल्यास ३०० कोटी रॉयल्टी मिळेल, सोमय्यांचा टोला

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवर गंभीर आरोप लगावले आहेत. त्यातच त्यांच्या इशाऱ्यानंतर काही दिवसातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनीवर आणि नातेवाईकांवर केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना आता किरीट सोमय्या यांनी थेट अजित पवारांना टोला लगावला आहे.

अजित पवार यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमध्ये घोटाळा केला असून नियमांचे उल्लंघन केलं आहे. यामुळे त्यांना उपमुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही असे सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवारांवर नेटफ्लिक्सने वेबसीरिज केल्यास पवारांना २०० ते ३०० कोटी रॉयल्टी मिळेल आणि त्यात पहिल्या सीजनमध्ये अजित पवार असतील अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच छापेमारी आणि घोटाळ्याच्या बाबतीमध्ये नेटफ्लिक्सने वेब सीरिज करायची झाल्यास अजित पवारांना रॉयल्टीमधून २०० ते ३०० मिळतील असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं आहे.राज्यातील ठाकरे -पवार सरकार हे घोटाळेबाज सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या पत्नीच्या नावे १९ बंगल्यांची संपत्ती उभी करु शकतात तर पवार काहीही करु शकतात असे सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Team Global News Marathi: