दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, विरोधकांचा घेणार समाचार |

 

मुंबई | कोरोनाच्या अप्र्श्वभूमीवर यावेळी सुद्धा शिवसेनेचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्क वर न घेता षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्याचं ठरलं आहे. या संदर्भातील माहिती खासदार संजय राऊत यांनी दिलेली आहे. उद्याच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून ते देशाच्या, राज्याच्या राजकीय घडामोडींवर बोलतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो.आमची मुलुखमैदानी तोफ उद्या धडाडणार आहे. कोरोनाचा नियमांचा भंग हाऊ नये म्हणून यंदा दसरा मेळावा षणमुखानंद हॉलमध्ये होत असून उद्धव ठाकरे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर बोलतील’ असे संजय राऊत म्हणाले. तसेच होणाऱ्या मेळाव्याला फक्त मुंबई आणि ठाण्यातील नेत्यांनी आपली उपस्थितीत दर्शवली असे सुद्धा सांगण्यात आले आहे.

यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वर टीका केली. चंद्रकांत पाटील यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने महाराष्ट्राला काहीही फरक पडत नाही. तोंडाच्या वाफा दडवणे हे त्यांचं कामच आहे असा टोला संजय राऊतांनी लगावला.

Team Global News Marathi: