अजित पवार म्हणाले,कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून एकजुटीने लढायची आहे. त्यासाठीच मी अन फडणवीस…

ग्लोबल न्यूज – कोरोनाविरुद्धाची लढाई सर्वांनी मिळून एकजुटीने लढायची आहे. त्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी एका मंचावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकत्र येणार असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमधून दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाची राजकीय मते वेगवेगळी असू शकतात. पण ही ती वेळ नाही. या संकटाच्या काळात आरोप प्रत्यारोप न करता एकता टिकवून ठेवणे गरजेचे आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. त्याचे आज (दि.28) उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार बोलत होते.

कार्यक्रमासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार हिंगे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनाचा रविवारपासून तिसरा कार्यक्रम आहे. शिवाजीनगर येथे 800 बेडचे जम्बो हॉस्पिटल, मगर स्टेडियमवरील हॉस्पिटल आणि आता ऑटो क्लस्टर येथे 200 खाटांचे रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले. ऑटो क्लस्टर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयाची उभारणी पालिकेने राज्य शासनाची मदत न घेता स्वतः केली आहे.

सुशांत प्रकरणी काँग्रेसने ट्विट केला फडणवीसांचा “तो” फोटो….!

अनेक सण उत्सव साजरे करताना बंधने घालावी लागत आहेत. कष्टक-यांची, वेगवेळ्या जाती धर्मांच्या लोकांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन उत्तम काम करत आहे. लवकरात लवकर कोरोनाच्या संकटातून सर्वांना बाहेर काढ, असे आपण गणरायाला साकडे घालत असल्याचेही पवार म्हणाले.

कोरोना साथीच्या काळात सरकारी हॉस्पिटल कमी पडायला लागली म्हणून खासगी हॉस्पिटल सरकारने ताब्यात घेतली. ती सुद्धा कमी पडू लागल्याने नव्याने हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत आहे.

कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडणार नाही. यासाठी हा सर्व प्रयत्न सुरु आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्यात आले आहेत. भरारी पथकांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांनी दिलेली 74 लाखांची वाढीव बिले कमी करण्यासाठी या पथकांनी प्रयत्न केले आहेत.

विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करा : अजित पवार

ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी पुण्यात घेण्यात आली. ही भारतातील पहिली मानवी चाचणी आहे. यामुळे लस लवकर येईल अशी आशा आहे. जगातील सर्व शास्त्रज्ञ लस लवकर निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: