सुशांत प्रकरणी काँग्रेसने ट्विट केला फडणवीसांचा “तो” फोटो….!
पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाची निर्मीत करणाऱ्या निर्देशकाचे नाव सिनेअभिनेता सुशांत सिह राजपूत प्रकरणी समोर आले होते. हाच मुद्धा पकडत आता काँग्रेसने भाजपाला टोला हाणला आहे. संदीप सिंह याच्यासाठीच या प्रकरणाचा तपास सीबीआय व ईडीकडे दिला का, असा प्रश्न काँग्रेसनं केला आहे.
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी सीबीआय संदीपची चौकशी करणार असल्याचीही बातमी आहे. त्यातच भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन संदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची विनंती केली आहे. मात्र सुशांत प्रकरणी त्याच ही नाव पुढे येऊ लागलं आहे. आणि तो देशाबाहेर पाळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता होत आहे.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी संदीप सिंह आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा एक फोटो ट्वीट केला आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या लाँचिंगच्या वेळचा हा फोटो आहे. संदीप सिंहचे भाजपशी जवळचे संबंध असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे.
‘संदीप सिंहचा सहभाग असल्यामुळंचे आधीच्या फडणवीस सरकारनं बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीचे आदेश दिले नव्हते का? सीबीआय व ईडीला सुशांत प्रकरणात सहभागी करून घेण्यामागे संदीप सिंह हेच कारण आहे का? भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांचे बॉलिवूड कलाकारांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मग आतापर्यंत बॉलिवूडमधील ड्रग व्यवहाराबद्दल भाजपला माहिती नव्हती का?,’ असे प्रश्न सावंत यांनी उपस्थित करत भाजपाला टोला लगावला आहे.