रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही अभ्यास करून बोलावं – फडणवीस

रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही अभ्यास करून बोलावं – फडणवीस
           
राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना जीटीबी समजत नाही त्यांनी अभ्यास करून बोलावे असा टोला राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी  टोला लगावला आहे. कराडच्या कृष्णा कृष्णा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकावरही निशाणा साधला होता.

हे ही वाचा: AU अर्थात आदित्य ठाकरे नसून अनया उदास असा अर्थ आहे, रिया चक्रवर्तीचे स्पष्टीकरण      
“रोहित पवारांना कॅलक्युलेशन समजत नाही. नीट अभ्यास केला पाहिजे आणि बोलले पाहिजे. महाराष्ट्रात एलबीटी जरी असतं तरी आपल्याला पैसे मिळाले नसते. नुकसान झाले, तोटा झाल्याचे बोलून काहीतरी आकडे सांगायचे, असे न करता नीट अभ्यास करुन बोलले पाहिजे असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना दिला.

रोहित पवार नेमकं काय म्हणाले होते?

“राज्यात भाजपची सत्ता होती त्यावेळी त्यांनी एलबीटी घाईघाईने रद्द केला. त्यामुळे गेल्या पाच वर्षात 26 हजार कोटींचं नुकसान झालं. त्यासाठी त्यांनी एकदाही पाठपुरावा केला नाही. हा पैसा जर आपल्याला मिळाला असता तर आरोग्य आणि इतर गोष्टींसाठी तो खर्च करता आला असता. मात्र ते भाजप आहे. त्यांना राजकारणच सुचतं”, अशी टीका रोहित पवार यांनी केली होती.

मला पुन्हा आई व्हायचं आहे… वाचावा असा लेख

“भाजप नेत्यांना खरच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील लोकांबद्दल कळवळा असता तर जीएसटीचे पैसे अनेक महिन्यांपासून केंद्र सरकारकडे अडकले आहेत. ते पैसे त्यांनी मागितले असते”, असा घणाघात रोहित पवार यांनी केला होता.

“आपल्या राज्यासाठी आणि लोकांसाठी राज्यातील भाजप नेत्यांनी एकदाही केंद्र सरकारकडे आवाज उठवला नाही. तसं कदाचित त्यांच्या धोरणात असेल किंवा भीतीपोटी केंद्राविषयी त्यांच्यातला कुठलाही नेता बोलू शकत नाही”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला होता.

‘जेव्हा नपुंसक पुरुषाशी आपलं लग्न झालंय हे कळलं तेव्हा…’

ग्लोबल न्युज नेटवर्क: