अजित डोवाल यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातं आहे. मुंबई स्थित राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली असून या फेटीदरम्यानचे फोटोही समोर आलेत.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय चर्चा झाली, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. आजतागायत वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीच थेट कोश्यारी यांची भेट घेतल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत. यातील एका फोटोमध्ये अजित डोवाल यांच्याकडून राज्यपालांना पुष्पगुच्छ देण्यात आल्याचं दिसून आलं. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही दिग्गजांमध्ये चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालंय. ही सदिच्छा भेट असल्याचं राज्यपालांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. शनिवारी सकाळीच ही भेट घेण्यात आली.

Team Global News Marathi: