आमच्या कमळाला ‘बाई’ म्हणत हिणवता, आम्ही तुम्हाला पेंग्विन सेना म्हणायचं का?”,

 

राज्यात सत्ता बदल झाला असला तरी अद्याप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू झाली आहे अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवा दोन दिवसांपासून होत्या. त्यांनी फडणवीसांची भेट घेतल्याने तर या अफवांचं बातम्यात रुपांतर झालं.

मात्र ही भेट गणेशदर्शनाच्या निमित्ताने झालेली होती, ती राजकीय भेट नव्हती, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करुन संबंधित बातम्यांचं खंडन केलं. हेच वृत्त प्रकाशित करताना “कमळाबाई आता हातघाईवर, भाजपची काँग्रेसवर वाईट नजर” असा मथळा सामनामध्ये आज छापून आला आहे. याच मथळ्यावरुन मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार चांगलेच संतापले आहेत. तुम्ही कमळाबाई म्हणता, आम्ही तुमच्या उरलेल्या सेनेला पेंग्विनसेना म्हणू का?, असा थेट सवालच त्यांनी सामनाचे संपादक तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातील ४० आमदार फोडल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे देखील काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा होती. पण योगायोगाने आमची भेट झाली, असं दोघा नेत्यांनी स्पष्ट करत संबंधित बातम्या अफवा असल्याचं सांगत मीडियावर रोष व्यक्त केला. आज ‘सामना’त हेच वृत्त प्रकाशित झालं, पण याचा मथळा कमळाबाई आता ‘हात’घाईवर, असा असल्याने शेलार चांगलेच संतापले आहेत. त्यांनी सामनाचे संपादक उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

“आपण आमच्या कमळाला हिणवायला बाई म्हणताय. हरकत नाही, बाईमध्ये आई-ताई आणि कडक लक्ष्मीपण असते. त्यामुळे तुमच्या उरल्या सुरल्या पक्षाला आम्ही आता पेंग्विन सेना म्हणायचं का?”, असा बोचरा सवाल करत असे अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहे, अशी आठवणच शेलारांनी ठाकरेंना करुन दिली आहे.

Team Global News Marathi: