संजय राऊत यांच्याविरोधातील महिलेची याचिका हायकोर्टाने फेटाळली

 

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून अज्ञात व्यक्तींनी आपली छेडछाड केल्याचा आरोप करणाऱ्या स्वप्ना पाटकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. संजय राऊत गेल्या सात वर्षापासून आपला छळ करत आहेत. असा आरोप त्यांच्यावर स्वप्ना पाटकर यांनी लावला आहे. मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाने स्वप्ना पाटकर यांची ही याचिका फेटाळून लावली आहे.

स्वप्ना पाटकर यांनी संजय राऊत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यामध्ये आपल्या मागे पाळत ठेवण्यासाठी माणसे लावली होती, हेरगिरी करणे, जीवानिशी मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ करणे, धमक्या देणे अशा आरोपांचा समावेश या महिलेने केलेल्या याचिकेमध्ये आहे. मात्र तत्पूर्वी संजय राऊत यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच सदर महिलेशी काही संबंध नसल्याचे या पूर्वीच जाहीर केले होते.

सदर महिलेने राऊत यांच्यावर आरोप लागवताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरून आपला पाठलाग आणि छळ केला अशी तक्रार त्यांच्या विरोधात करण्यात आली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना सुद्धा दिले होते. त्यांनतर आज न्यायालयाने महिलेची याचिका फेटाळली आहे.

Team Global News Marathi: