‘मी अशी चूक भविष्यात पुन्हा करणार नाही’ राणेंनी कोर्टात लेखी दिले लिहून

 

महाड | शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य केल्या प्रकरणी केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालं होतं. मात्र राणे यांना अखेर महाड न्यायालयाने दिलासा दिसा असून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रात्री उशिरा हा जमीन मंजूर 15 हजार जातमुचलक्यांवर करण्यात आला आहे. तसेच, नारायण राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

याबाबत एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोर्टाने नारायण राणे यांना महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश दिले आहे. तसेच, भविष्यात यापुढे अशी चूक ( वादग्रस्त विधान ) होणार नाही, अशी ग्वाही खुद्द नारायण राणे यांनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. सोमवारी एका पत्रकार परिषदेत राणेंनी थेट मुख्यमंत्र्यांना झापड मारण्याचे विधान केले होत यावरून ट्यंचाय्वर विविध जिल्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जामिनावर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पहिलं ट्वीट केलं आहे. केवळ दोन शब्दात राणेंनी ट्वीट केलं. खरंतर जामिनावर बाहेर पडलेले नारायण राणे काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. ‘सत्यमेव जयते’ असं दोन शब्दांचं ट्वीट राणेंनी रात्री १२.३२ च्या सुमारास केलं आहे. तर त्यांचे पुरा आमदार नितेश राणे यांनी मनोज वाजपेय यांच्या चित्रपटाचा सीन ट्विट करून थेट सेनेला आव्हान दिले होते.

Team Global News Marathi: