आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

 

मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात नेले होते. तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. भल्या पहाटे ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

मात्र आठ तासाच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने चौकशीअंती नवाब मलिक यांना अटक केली आहे. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना जे जे रुग्णालयात नेण्यात येत आहे. ईडी कार्यालयाबाहेर तणाव वाढला आहे असून एनसीपीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत कार्यकर्त्यांना हुस्कावाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची अंडरवर्ल्ड कनेक्शन प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी याप्रकरणात एनआयए आणि ईडीकडून मुंबईत संयुक्तपणे छापे टाकण्यात आले होते. कुख्यात गुंड दाऊदची दिवंगत बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मालमत्तांवरही छापे टाकण्यात आले होते. तसेच दाऊदचा भाऊ इकबाल कासकर यालाही ईडीने अटक केली होती. इकबाल कासकरच्या चौकशीत नवाब मलिक यांचे नाव पुढे आल्याचे समजते. त्यामुळे ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी होती असल्याचे समजते.

Team Global News Marathi: