कौतुकास्पद : म्हाडा कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला ४० लाखाची मदत

सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा मोठया झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज वाढत असलेल्या कोरोनाच्या रुग्णसंख्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला आहे. तसेच राज्य सरकारकडून मोफत लसीची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत अनेकांनी सहाय्यता निधीत मदत सुद्धा जमा केली होती.

त्यातच आता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत म्हाडाचे कर्मचारी एक-दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. त्यातून सुमारे 40 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा होतील अशी माहिती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी बुधवारी दिली आहे. महानंदा कर्मचाऱ्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

कोरोना विरोधातील लढय़ासाठी म्हाडातील अधिकारी व कर्मचा-यांनी एक-दोन दिवसांचे वेतन स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे आवाहन विनोद घोसाळकर यांनी केले होते. म्हाडातील महाराष्ट्र गृहनिर्माण कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना व ग्रॅज्युएट इंजिनिअर्स असोसिएशन ऑफ म्हाडा या तीनही संघटनांनी प्रतिसाद देत मे महिन्यातील एक दोन दिवसांचे वेतन देण्यास सहमती दिली अशी माहिती विनोद घोसाळकर यांनी दिली.

Team Global News Marathi: